Trophical sawan Climate Esaay In Marathi/श्रावणमास निबंद

               २.  श्रावणमास



[मुद्दे : श्रावणमास, हवाहवासा वाटणारा - श्रावण केव्हा येतो ?- चौफेर हिरवळ - विविध रंगांनी नटलेली धरती - ऊन-पावसाचा खेळ - इंद्रधनुष्याची कमान - समृद्धी- सण, उत्सव, यांची रेलचेल - चैतन्याची उधळण - अमाप निसर्गसौदर्य.]
         ग्रीष्मातील उन्हाचे चटके नकोसे झाल्यावर माणूस पावसाची खूप वाट पाहू लागतो. आषाढात तो एवढा कोसळतो की' थांब रे बाबा !' अशी मनाची अवस्था होते आणि त्याच वेळी श्रवणाची चाहूल लागते. दरवर्षी तो आपणाला नवानवा वाटतो, हवाहवासा वाटतो.
           वर्षातील बारा महिन्यांपेक्षा श्रावण किती वेगळा आहे ! श्रावणात वातावरण आल्हाददायक असते. धरणी पाणी पिऊन तृप्त झालेली असते. सारी सृष्टी हिरवीगार झालेली असते. श्रावण महिन्यातील ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहून मनाला आनंद
होतो. कधी अचानक आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटते. अशा या श्रवणाचे वर्णन बालकवींनी-  
'श्रवणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे   
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे !'
या सुंदर शब्दांत केले आहे.
   
         श्रावण महिना मुलामाणसांत, पशु-पक्ष्यांत, पानाफुलांत, सर्वत्र चैतन्य पसरवून देतो.श्रावण महिना समृद्धी देतो. माणसे सण, व्रत-वैकल्ये करू लागतात. श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. नागपंचमीला नागाची पूजा, नारळीपौर्णिमेला सागराची पूजा.
बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांचे आभार मानायचे. गोकुळाष्टमीला लाडक्या कृष्णाया वाढदिवस साजरा करायचा. फुले, पाने, मुंगे, पाखरे सारेच आनंदाने बेहोष होतात.
          श्रावण महिन्याचे निमित्त करून माहेरवाशिणो माहेरी येतात. हातांना मेंदी लागते.झाडांना झपाटे बांधले जातात. शहरांतील मंडळी वर्षसहली काढतात. निसर्गानेि उधळलेले अमाप सौंदर्य-वैभव लुटायला माणसांचे दोन डोळे अपुरे पडतातअसा हा रंगबेरंगी श्रावण !

[शब्दार्थ :
1)ग्रीष्य-summer. ग्रीष्मऋतु।
2)आल्हाददायक - pleasant,delightful,आनंददायक । 3)पाठशिवणीचा खेळ -hide and seek.लुका-छिपी का खेल।
4)शिरवे-heavy showers of rain falling intermittently.रुक-रुक कर होने वाली जोरदार बरसात।
5)चैतन्य-life enthusiasm.प्राण, चेतना, उत्साह।
6)रेलचेल असणे -to abound.भरमार होना बहुतायत
7)पोळा- the name of a festival that honoursa the bullocks.बैलों की पूजा करने का त्योहार -पोला।]
Trophical sawan Climate Esaay In Marathi/श्रावणमास निबंद Trophical sawan Climate Esaay In Marathi/श्रावणमास निबंद Reviewed by Shivam on June 02, 2018 Rating: 5

No comments