माझी भारतभूमी मराठी निबंद

                    ८.माझी भारतभूमी

[मुद्दे : भारतमाता - देशाची वैभवशाली ऐतिहासिक परंपरा - महान संस्कृती - वीरांचा देश - जगाला भारताकडून तत्वज्ञान, आयुर्वेद, गणित, विज्ञानाची देणगी-सुजलाम्,सुलाम् - पावित्र्य प्राप्त करून देणार्या गोष्टी - तंत्र विकास-मायभूमीच श्रेष्ठ.]
        माझ्या भारतमातेला फार मोठी वैभवशाली परंपरा आहेभारताची प्राचीन संस्कृतीही महान आहेभारत हा वीरांचा देश आहे. प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी होती, ज्ञानभूमी होती. जगातील वेगवेगळ्या देशांतून माणसे येथे ज्ञान संपादन करण्यास येत होती. प्राचीन काळी तत्त्वज्ञान, अध्यात्म यांची भूमी म्हणून भारताला मान होता . अध्यात्म, आयुर्वेद गणित आणि विज्ञान या क्षेत्रांतील अनेक मूलभूत गोष्टी भारताने जगाला दिल्या आहेत.
           निसर्गही माझ्या भारतभूवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नदयांनी भारतभू सुजलाम् केली आहे. त्यामुळे येथे सृष्टीची विविध रूपे पाहायला मिळतात. भव्य हिमालय आम्हांपुढे उदात्ततेचा व महानतेचा आदर्शच उभा करतो.भारताच्या तिन्ही बाजूना महासागर पसरलेला आहे. तो आमच्या मनाला विशालता देतो.भारतभूमी ही वृक्ष, पाने, फुले व फळे यांनी समृद्ध आहे.
           अशीच विविधता भारतभूमीतील माणसांत आहे. भिन्न भाषा, भिन्न धर्म, भिन्न पंथ,भिन्न विचार यांनी भारतीय संस्कृती सजलेली आहे. विविधतेत एकता' हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहेभारतात विविध भाषा बोलल्या जातात आणि या विविध भाषांतील साहित्यही समृद्ध आहे. भारतातील अनेक भाषांचा उगम असलेली संस्कृत भाषा ही आमची प्राचीन भाषा आहे. या भाषेत रामायण, महाभारत यांसारखे महान ग्रंथ निर्माण झाले आहेत. भगवद्गीता आजही जगाला मार्गदर्शक ठरत आहे
       भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची कहाणीही जगाला स्फूर्तिदायक आहेभारतात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि औद्योगिक क्रांती झाली. भारत कोणत्याही क्षेत्रात मागे राहिला
नाही. आजच्या संगणक युगातही भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणू शकतो की, माझी मायभूमी ही स्वर्गापेिक्षाही श्रेष्ठ आहे.


[ शब्दार्थ :
1)सुवर्णभूमी-land of gold.स्वर्णभूमि।
2)ज्ञानभूमी - land of knowledge.ज्ञानभूमि।
3)तत्त्वज्ञान-philosophy.तत्त्वज्ञान,दर्शनशास्त्र।
4)अध्यात्म-spirituality .अध्यात्म।
5)आयुर्वेद - Ayurved.आयुर्वेद।
6) क्रांती -revolution.क्रांति।
7)स्वर्ग-heaven.स्वर्ग।]
माझी भारतभूमी मराठी निबंद  माझी भारतभूमी मराठी निबंद Reviewed by Shivam on August 25, 2018 Rating: 5

No comments